सहा महिन्यांत ९० साखळीचोरीचे गुन्हे

 पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये सोनसाखळी चोरीचे ९० गुन्हे घडले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, काही ठरावीक वेळेत अधिक सोनसाखळी चोऱ्या होत असून सोनसाखळी चोरीसाठी चोर दुचाकीचा वापर करत असले तरी पायी चालत येऊनही चोऱ्या केल्या जात आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, अंबरनाथ आदी शहरांमध्ये सोनसाखळी चोरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. चोर भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचत असल्याने रस्त्यावरून पायी जाणे अवघड झाले आहे. सोनसाखळी खेचल्यानंतर चोर दुचाकीवरून वेगात पळून जात असल्याने त्यांना पकडणे शक्य होत नाही. नंतर त्यांचा लवकर थांगपत्ताही लागत नाही. परिणामी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत असून या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यामध्ये पोलिसांना अद्याप पूर्णपणे यश आले नाही. आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक किंवा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. काही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर वारंवार हे प्रकार होत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *