सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोडसंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर आता राज्य सरकारने मोबाईल वापरासंबंधीच्या शिष्टाचारासंबंधीही अशाच मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कार्यालयात मोबाइलचा वापर करताना काही वेळा कर्मचाऱ्यांकडून शिष्टाचार पाळला जात नसल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते, त्यामुळे हा सूचना जारी केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.
सूचना
- सरकारी कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) प्राधान्याने वापर करावा.
- कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइलचा वापर करावा.
- मोबाइलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहेत, याचाही विचार करावा.
- मोबाइलवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, असंसदीय भाषेचा वापर करू नये, वाद घालू नये.
- कार्यालयीन कामासाठी शक्यतो एसएमएसचा वापर करावा, बोलायचे झाले तरी कमी वेळेत बोलावे.
- मोबाइलवर व्यस्त असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावे.
- मोबाइलवर समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे
- अत्यावश्यक वैयक्तिक मोबाइल कॉल आपल्या कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्यात यावा. त्यावेळी एसएमएस तपासणे, एअर फोन वापरणे वगैरे टाळावे.
- कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर असताना आपला मोबाइल बंद ठेवू नये.
