बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळाविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला आहे. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हेअडचणीत आले आहेत.
