आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. पुराचे पाणी रात्री शहरात घुसल्याने त्यांना सुरक्षित स्थळी जाता आले नाही आणि ते पाण्यातच अडकून पडलेत. 2005नंतर भयानक परिस्थिती निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी नाकरिकांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न महापुरामुळे अपुरा पडला. हळहळू पुराचे पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिक भितीच्या छायेखाली गेलेत. ते आजही कायम आहेत. त्यांना मदत मिळत नाही. काहींनी अडकल्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अपुरा पडला. एकाला बाहेर काढताना नागरिकांनी प्रयत्न केला पण तो पुराच्या पाण्यात पडला आणि एकच….दरम्यान, चिपळूणमध्ये पावसाच्या हाहाकाराची दाहकता दाखवणारा फोटो समोर आला आहे. चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि बघता बघता पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या मजल्यावर पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा सगळा प्रकार चिपळूणच्या ओक पेढीमध्ये समोर आला आहे.
