राज्यात अखेर शाळेची घंटा वाजली, या 5 जिल्ह्यात शाळा गजबजल्या

 कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेनंतर राज्यातील शाळा (School), महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अद्याप जवळपास सगळ्याच शाळा बंद आहेत. मात्र, आता दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर काही जिल्ह्यांत शाळा सुरु (Schools Started) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात तसेच मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे.परभणी जिल्ह्यात आज अखेर शाळेची घंटा वाजली. राज्य शासनाने आजपासून 8वी ते 12 वीच्या शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. परभणी जिल्ह्यात 843 शाळांपैकी कोरोनाचे सर्व नियम  पाळून 500 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थी उपस्थिती होती. मास्क सॅनिटायरचा वापर करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला गेला

लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी शाळा भरली आहे. निलंगा तालुक्यातील दापका येथील जय भारत विद्यालयात 8वी ते 10 वीचे वर्ग भरले. विद्यार्थी संख्या अत्यल्प असली तरी कोरोना नियमांचे पालन करून ही शाळा भरविण्यात आली. विद्यार्थी, शिक्षकांची प्राथमिक तपासणी करूनच शाळेत प्रवेश देण्यात आला. ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्यांदाच शाळेत आल्याचा उत्साह आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *