काशीद येथे पूल कोसळला ; अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत!

अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आज (रविवार) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर, वाहनं देखील  बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. पूल जीर्ण झाला आहे त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *