लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचा जीव सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. कळवा स्टेशनवरील मोबाईल चोरामुळे जीव गेल्याची घटना आपण पाहिली होती. अगदी तसाच प्रकार पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडला आहे. यात मोबाईल चोराचा पाठलाग करणाऱ्या एका पश्चिम रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा जीव जाता जाता वाचलाय. त्यानंतर सीसीटिव्ही आधारे रेल्वे पोलिसांनी देखील चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर काल दुपारी ही घटना घडलेली आहे. विरारवरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होते. स्नेहल हल्लीच पश्चिम रेल्वेमध्ये ज्युनियर इंजीनियर या पदावर रुजू झाली. तिला साडेपाच वाजता आपल्या कामावर पोहचायचे होते. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून तो खाली उतरला. मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचा जीव सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. कळवा स्टेशनवरील मोबाईल चोरामुळे जीव गेल्याची घटना आपण पाहिली होती. अगदी तसाच प्रकार पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडला आहे. यात मोबाईल चोराचा पाठलाग करणाऱ्या एका पश्चिम रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा जीव जाता जाता वाचलाय. त्यानंतर सीसीटिव्ही आधारे रेल्वे पोलिसांनी देखील चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर काल दुपारी ही घटना घडलेली आहे. विरारवरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होते. स्नेहल हल्लीच पश्चिम रेल्वेमध्ये ज्युनियर इंजीनियर या पदावर रुजू झाली. तिला साडेपाच वाजता आपल्या कामावर पोहचायचे होते. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून तो खाली उतरला. मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे.
