ब्रिटन लवकरच टाळेबंदीमुक्त!

ब्रिटनमधील करोना टाळेबंदी येत्या १५ जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येईल, असे  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले, की निर्बंध मागे घेण्यासाठी वेळापत्रक ठरवण्यात येत आहे.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजीद जावीद यांनी संसदेत सांगितले, की १९ जुलैपासून टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात येईल. त्याबाबत ठोस महिती पुढील सोमवारी म्हणजे १२ जुलैला सविस्तर आढाव्यानंतर जारी करण्यात येईल.

जॉन्सन म्हणाले, की टाळेबंदीचा शेवटचा टप्पा वेगळा राहील, त्यानंतर बहुदा टाळेबंदी करण्यात येणार नाही. आमच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेने वेगाने लसीकरण करून मोठय़ा प्रमाणात प्रगती साधली आहे. ४ टप्प्यांत लोकांचे स्वातंत्र्य त्यांना पुन्हा कसे बहाल करता येईल याचा विचार करता येईल. असे असले तरी ही साथ अजून  संपलेली नाही. ती काही दिवस राहील, रुग्णही सापडत राहतील यात शंका नाही. आपण आता विषाणूसमवेत राहायला शिकलो आहोत. कोविड काळातील जोखीम टाळणे त्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यासाठी कुठलेही निष्कर्ष घाईने काढणे चुकीचे ठरेल.

डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने म्हटले आहे, की पब्लिक हेल्थ इंडिया या संस्थेने कोविड लशी प्रभावी असल्याचे दाखवून दिले. डेल्टा विषाणू पहिल्यांदा भारतात  सापडला होता. आतापर्यंतच्या चाचण्यांनुसार फायझर व बायोएनटेकची लस त्यावर ९६ टक्के तर ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस ९२ टक्के प्रभावी आहे. सोमवारी २७,७१४ रुग्ण सापडले.

३३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एकूण १,६११ जण रुग्णालयात दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *