पर्यावरणातील प्रत्येक घटक हा अनेकदा आपल्याला थक्क करुन जातो. सध्या निसर्गातील असाच एक घटक सर्वांचं लक्ष वेधत आहे. अर्थात या घटकाचा पिकांवर परिणामही होत आहे. पण, त्याचा आकार पाहता प्रथमदर्शनी सर्वांचंच लक्ष वेधलं जात आहे. हा प्रकार म्हणजे शंखु अळीचा.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात शेती कसणे म्हणजे जिकरीचं काम. कारण हा संपूर्ण भाग पहाडी भाग आहे. त्यात अनेकदा पाऊस जास्त होतो त्यामुळे हमखास उत्पन्नाची हमी देखील नाही त्यामुळे येथील शेतकरी नेहमी विविध संकटात सापडत असतो. पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे.
पिकांवर पडलेल्या ‘केसाळ’ अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांचे पाने ही अळी कुरतडत आहे. दरम्यान या अळीचा सर्वाधिक प्रभाव हा चिखलदरा तालुक्यातील जंगल परिसरातील गावांमध्ये दिसून आला. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून शेतात बियाण्याची पेरणी केली त्या शेतात मात्र या अळीचा प्रादुर्भाव नसल्याचा जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले.
