पर्यटकांना खोली भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड

बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्यानं दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल असं पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं काढलं आहे. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात पर्यटनाला परवानगी नाही. पण, त्यानंतर देखील काही प्रमाणात पर्यटक जिल्ह्यातील गणपतीपुळेसह इतर ठिकाणी दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे राहण्यासाठी हॉटेलचा आसरा घेतला जातो. काही पर्यटक रात्री उशिरा देखील येतात. परिणामी त्यांना नकार देणे कठिण जाते. पण, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे सध्या हॉटेल व्यवसायिकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *