जिल्ह्यात सोमवारी ११४ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ११८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दिवसभरात सहा बाधितांचा मृत्यू झाला असून, पोर्टलवर एकही मृत्यू नोंदविला गेलेला नाही.
शहरात दिवसभरात ५३, तर ग्रामीण भागात ६० जणांना संसर्ग झाला आहे. मालेगावातही एकजण बाधित आढळला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ९४ हजार १९४ झाली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या ३ लाख ८३ हजार ३४४ झाली आहे. सध्या २,५११ रुग्ण उपचार घेत असून, १,०१८ संभाव्य रुग्णांचे अहवाल बाकी आहेत. दिवसभरात सहा बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, यापैकी दोन मृत्यू शहरात, तर चार मृत्यू ग्रामीणमध्ये नोंदविले गेले आहेत. पोर्टलवर एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. एकूण मृतांची संख्या ८,३३९ पर्यंत पोहोचली आहे.
