दहा वर्षीय सईने सायकलने गाठली नवी मुंबई

नवी मुंबईतील सिडको घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी अलिबागपासून, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडीपासून लोक बेलापूरमध्ये येत होते. त्यांच्यामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठाण्यातील बाळकूमवरून ही मुलगी सायकल चालवत बेलापूरच्या आंदोलनापर्यंत पोहोचली होती. हा प्रवास तिने तासाभरात पूर्ण केला. बाळकूम ते बेलापूर पालिका मुख्यालय हे अंतर २५ किमी इतके आहे. मात्र मध्ये मध्ये थांबत ती इथपर्यंत पोहोचली. तिच्यासोबत तिचे वडील होते. ते बाइकवरून तिच्या मागून येत होते. आमच्या जमिनीवरील प्रकल्पला आमच्याच नेत्याचे दि. बा. पाटील यांचे नाव द्यायला हवे, असे तिने सांगितले. सई सायकलपटू आहे. तिच्या नावावर काही विक्रमही आहेत. तिने बाळकूम ते पुणे हा प्रवास सायकलने केला आहे. त्याची विक्रमी नोंद झाली आहे. चार वर्षांची असल्यापासून ती सायकल चालवत आहे. आता पुढे श्रीनगर ते काश्मीर या प्रवास सायकलने करून त्याचा जागतिक विक्रम करण्याचा तिचा मानस असल्याचे तिचे वडील आकाश पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *