अँटिफंगल औषधांचा ठाण्यामध्ये तुटवडा

करोनाउपचारादरम्यान उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसबाबातीत जिल्हा आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. म्युकरमायकोसिस संक्रमणाबाबत पूर्व खबरदारी घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यात अँटिफंगल औषधांचा तुटवडा असल्याचे आढळून आले आहे.

करोनाचे संकटातच म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत करोनाकाळातील औषधांच्या तुटवड्याची पुनरावृत्ती ही या आजाराबाबतीतही होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असतानादेखील ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभाग मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आहे. करोना काळात रेमडेसिवीर तसेच तत्सम इतर औषधे मिळवण्यासाठी करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *