भाडे नाकारल्याने टॅक्सीचालकाची हत्या

भाडे नाकारल्याच्या रागात प्रवाशाने टॅक्सीचालकाची हत्या केली. ही घटना पहाटे सहाच्या सुमारास दादरच्या कबुतरखान्याजवळ घडली. पोलिसांनी आरोपी प्रवाशास अटक केली. छबीलाल जैस्वार (५५) असे टॅक्सीचालकाचे नाव आहे. आरोपी बसवराज मेलीनामानी (३०) दादरच्या आंबेडकर नगर येथे राहतो आणि भवानी शंकर मार्गावरील बाजारपेठेतील फेरीवाल्यांकडे मजुरी करतो. पहाटे सहाच्या सुमारास त्याने घरी जाण्यासाठी जैस्वार यांची टॅक्सी थांबवली. मात्र जैस्वार यांनी हे भाडे नाकारले. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. प्रसंग हाणामारीपर्यंत गेला. बसवराज याने जैस्वार यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. एका दुकानाबाहेरच्या सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी चार तासांत बसवराजला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *