दैव बलवत्तर म्हणून… विक्रोळीत भलंमोठं झाड कोसळलं, महिला थोडक्यात बचावली!

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली आहे. यात मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी नागरिक जखमी देखील झाले आहेत. विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यासमोर देखील अशाचप्रकारे एक झाड कोसळलं. दैव बलवत्तर होतं म्हणून एक महिला थोडक्यात बचावली. ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फूटेजनुसार, विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोरुन सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूचं भलं मोठं झाड कोसळलं. यावेळी या झाडाखालून काही पादचारी जाताना दिसत आहेत. यात एक महिला अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती. परंतु मोठा आवाज झाल्याने ती धावत मागे गेल्याने तिचे प्राण वाचले आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत महिला थोडक्यात बचावली.

दरम्यान हे झाड कोसळून पोलिसांच्या गाडीसह आजूबाजूचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *