अभिनेत्री डॉली ब्रिंदाला जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री डॉली ब्रिंदाला जीवे मारण्याची धमकी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ यांच्याविरोधात तक्रार देणाऱ्या अभिनेत्री डॉली बिंद्रा यांना सोमवारी रात्री जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांनी या प्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
डॉली बिंद्रा यांनी तक्रारीत राधे माँ यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे यापूर्वीच कौटुंबिक छळवणूकीचा आरोप असलेल्या राधे माँ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिंद्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे, की राधे माँकडून आपल्या जीविताला धोका असून तिच्या भक्तांकडून आपल्याला धमकीचे फोन येत आहेत. 
 
डॉली बिंद्रा तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना अज्ञात नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यांना हा जीवे मारण्याचा धमकीचा दूरध्वनी माध्यमांचे प्रतिनिधी असताना आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *