महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai)Tauktae या चक्रीवादळाचा तडाखा (Cyclone Tauktae) बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कोरोना लसीकरण Corona Vaccination) थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (BMC)अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरण अभियान पुढील दोन दिवस तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
बीएमसीने (BMC)शुक्रवारी ट्वीट करुन दोन दिवस लसीकरण रद्द केल्याची माहिती दिली. आता त्यानुसार मुंबईत लसीकरण मोहीम 15 आणि 16 मे पर्यंत तहकूब करण्यात येणार आहे. मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, ‘Tauktae’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली असून लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
