भंडाऱ्यात आढळले वाघाच्या बछड्यांचे मृतदेह; जवळच वाघिणीच्या पावलांच्या खुणा असल्याने शोध सुरु

भंडाऱ्यात वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले आहेत. भंडारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मंगळवारी सकाळी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. मंगळवारी भंडारा जवळील बेला येथे एका वाघाचे पगमार्क दिसून आले होते. त्याचा आणि या वाघाच्या बछड्याचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.

पोलीस प्रशिक्षण घेत असताना नेहमीप्रमाणे सकाळी धावण्यास गेले असता तरुणांना वाघाचे दोन बछडे गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ वनखात्याला याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी वाजूरकर आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बछड्याजवळ वाघिणीच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या. वनखात्याची चमू वाघिणीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *