बॉलिवूड फोटोग्राफरने सुरू केला ऑनलाईन सेक्स रॅकेटचा धंदा; वेबसाईटवरून तरुणींशी संपर्क

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या बॉलिवूड फोटोग्राफर नसिर खानला ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक झाली आहे. करन ठाकुर या नावाने नसिर सेक्स रॅकेट चालवत होता. मुंबई क्राईम ब्रॅंचने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

महाराष्ट्रसह देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे कडक निर्बंध लावले आहेत. तरीही गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या नसिरने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. नसिर अनैतिक धंदा तर करतच होता शिवाय, तो नाव बदलवून हा धंदा करीत होता. करन ठाकुर नावाने नसिर सेक्स रॅकेट चालवत होता. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या नसिरने पैसा मिळवण्यासाठी ऑनलाईन सेक्स रॅकेटचा शॉर्टकट पद्धत वापरली.

लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरातच आहेत. प्रशासनाने संचार बंदी लागू केली आहे. याचा विचार करून नसिरने ऑनलाईन सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आणि ग्राहकांमध्ये ऑनलाईन (व्हर्चुअल) पद्धतीने संपर्क होत होता.

नसिरने ऑनलाईन सेक्स रॅकेटसाठी टीम तयार केली होती. त्यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. त्यात तरुणींचे फोटो आणि मोबाईल नंबर अपलोड करण्यात येत असत. संपर्क करण्यासाठी ऑनलाईन पैसे जमा करण्यात येत असत.

ज्यावेळी नसिर खानला बेड्या ठोकण्यात आल्या त्यावेळी त्याच्या जवळ तीन तरुणी उपस्थित होत्या. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *