वडिलांसह तिघांकडून मुलाचा मारहाण करून खून

अशोक गोपीनाथ धनवटे (वय २८ वर्षे, रा न.पा.वाङी, ता. राहाता) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत अशोक हा सतत दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देत असायचा. रविवारी रात्री मयत अशोक हा दारू पिऊन घरी आला असता त्याने घरातील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली.  मुलाच्या त्रासाला कंटाळून मयत अशोक यास वडिलांसह तिघांनी  संगनमत करून लाकङी दांडक्याने जबर मारहाण केली, त्यात अशोक जागीच ठार झाला. मयत अशोकचा मृतदेह रात्रभर तसाच पडून होता. आज सोमवारी सकाळी न पा वाडीच्या पोलिस पाटील  योगिता प्रताप धनवटे यांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी तातडीने राहाता पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिस पाटील  योगिता प्रताप धनवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मयत अशोक याचे वडील व आई गोपीनाथ बाबुराव धनवटे,कमल गोपीनाथ धनवटे (दोन्ही रा न.पा.वाङी ता राहाता) यांच्यासह धनंजय बाबासाहेब धनवटे (रा निर्मळ पिंप्री ता राहाता) सागर साहेबराव खरात (रा निमगाव ता राहाता ) या चार जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *