नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड गावातील शेतकऱ्याचा 20 क्विंटल कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. आबासाहेब पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्यांचा कांदाचाळीत साठवलेला 20 क्विंटल कांदा चोरीला गेला आहे.
कालच मुंबईच्या प्रतीक्षानगर भागातून 750 किलो कांद्याची चोरी झाली होती. मुंबईतील प्रतिक्षानगरमधील एका दुकानातून शुक्रवारी रात्री कांद्याच्या 14 पोत्यांची चोरी झाली. 14 पोत्यांत ७५० किलो कांदा होता. त्यामुळे वाढत्या दरांमुळे आता चोरटे सोन्याऐवजी कांद्याचीच चोरी करायला लागल्याचं समोर येत आहे.

