वायुदलाचे मिग २१ कोसळले

वायुदलाचे मिग २१ कोसळले

सरावासाठी श्रीनगर विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळाने वायुदलाचे मिग २१ बायसन विमान जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील सोईबाग (Soibugh) येथे कोसळले. हा अपघात सकाळी १०.५९ वाजता झाला. वेळीच विमानातून बाहेर पडल्यामुळे या दुर्घटनेतून वैमानिक वाचला. विमानातून सुरक्षितरित्या बाहेर पडलेल्या वैमानिकाला लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे श्रीनगर विमानतळावर आणण्यात आले.

अपघातामागील कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिल्याचे वायुदलाने सांगितले. अपघातात जिवीत हानी झालेली नाही, असेही वायुदलाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *