गांधी घराण्याच्या तीन पिढ्या रेल्वेमार्गही बांधू शकल्या नाहीत : स्मृती इराणी

गांधी घराण्याच्या तीन पिढ्या रेल्वेमार्गही बांधू शकल्या नाहीत : स्मृती इराणी

गांधी घराण्याच्या तीन पिढ्या अमेठीत साधा रेल्वेमार्ग टाकू शकल्या नाहीत, असा हल्लाबोल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या ‘सुरक्षाबंधन’ योजनेचा शुभारंभ करताना इराणी अमेठीत बोलत होत्या.

गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या आणि सध्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या अमेठीच्या विकासाच्या मुद्द्यावरुन इराणी यांनी गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले.

विकासाच्या नावाखाली काँग्रेसने अमेठीत भूखंड घोटाळा केल्याचा आरोपही यावेळी इराणी यांनी केला. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून अमेठी ते बांदा रस्त्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. सुलतानपूर-अमेठी आणि अमेठी-रायबरेली दरम्यान दुहेरी रेल्वेमार्गाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *