ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.
‘हिरन मनसुख यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवत आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीचा अर्ज एनआयएतर्फे करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने हा आदेश दिला.
