राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे. विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय जैन (Champat Rai Jain) यांनी सांगितले की, श्री राम मंदिर बांधण्यासाठी राजस्थानकडून सर्वाधिक 515 कोटी रुपये अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी मिळाली आहे. हे पैसे राज्यातील 36 हजार गाव आणि शहरांतून जमा झाले आहेत.
राय म्हणाले की, देशातील मकर संक्रांत ते माघी पौर्णिमेपर्यंत 42 दिवस चाललेल्या मोहिमेमध्ये सुमारे 9 लाख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन देणगी जमा केली. 4 मार्चपर्यंत मंदिर बांधण्यासाठी 2500 कोटी रुपये जमा झाले आहेत. तथापि, अद्याप शेवटचा आकडा येणे बाकी आहे. त्यांनी सांगितले की या जमिनीवर जवळपास 500 विशाल वृक्ष आहेत, त्यांना कोणताही धोका न पोहोचवता आणि न कापता दुसर्या ठिकाणी हलविण्यात येईल.
राम मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती देताना राय म्हणाले की, मंदिराच्या पायाभरणीसाठी मिर्जापूरचा दगड बसविण्याचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर भरतपूर जिल्ह्यातील बंशी पहाडपूरचा दगड मंदिर उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. राम मंदिरात तीन मजले असेल आणि प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. येथे एकूण 160 खांब उभारले जाणार आहेत. सुमारे अडीच एकरात फक्त एक मंदिर बांधले जाईल. तर चारही एकरांवर व्हरांडा बनविला जाईल. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल.
