9 वर्षानंतर रविवार सर्वाधिक ‘हॉट’ दिवस, या आठवड्यात तापमान कसे असणार?

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) तसा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तापमानात (Weather) अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. कोकण पट्ट्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक वाढ होईल. तर विदर्भातही उन्हाळा अधिक तीव्र असणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या चालू असलेला महिना अर्थात मार्च ते पुढील मे महिन्यादरम्यान देशभरात कडक उन्हाळा असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लोकांना केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीदेखील गरमीपासून सुटका मिळणार नाही, असेच दिसून येत आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत उष्ण हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे.

तसेच गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, ओडिशा, कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा समुद्र किनाऱ्याचा भाग याठिकाणी तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.  दरम्यान, 2006 नंतर पहिल्यांदाच यंदाचा फेब्रुवारी महिना कडक होता. तर दिल्लीत 12 वर्षानंतर 7 मार्च अर्थात रविवार हा उधिक कडक होता.दरम्यान, दिल्लीतही पारा वाढला आहे. गेल्या 9 वर्षानंतर रविवार हा सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. 2012 नंतर रविवार हा दिल्लीचा सर्वात उष्ण दिवस होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारीचे कमाल तापमान सामान्यपेक्षा 5 डिग्री आणि सामान्यपेक्षा 34.4 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज सोमवारी कमाल तापमान 31 आणि किमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *