कुंभमेळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या साधू महंतांचे विविध रंग भाविकांना पहायला मिळत आहेत. त्र्यंबकेश्वरला आलेल्या एका साधूने तब्बल सव्वा किलो सोनं अंगावर घातलं आहे.
“मी सोन्याला धारण केलेलं नाही, तर सोन्यानंच मला धारण केलं आहे.”, असा अजब फंडाही ते मांडतात.
त्र्यंबकेश्वरला असलेल्या ब्रम्हा व्हॅली शैक्षणिक संकुलातल्या असलेल्या भव्य यज्ञासाठी महामंडालेश्वर अरुणगिरीजी महाराज सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. महामंडालेश्वर अरुणगिरीजी महाराजांनी साधारणतः सव्वा किलो सोनं अंगावर घातलं आहे. अरुणगिरी महाराज हे सोनं दानस्वरूपात मिळाल्याचं सांगत आहेत.

