युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच मोठ्या पडद्यावर, जेनेलिया-रितेशचा मेगा प्लॅन

युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच मोठ्या पडद्यावर, जेनेलिया-रितेशचा मेगा प्लॅन

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमाची निर्मिती करणार करणार असून विशेष म्हणजे रितेश देशमुख यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

जेनेलियाने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. “छत्रपती शिवाजी हा फक्त सिनेमा नाही तर मोठी जबाबदारी आहे. मराठा योद्ध्यावर चित्रपट बनवण्यासाठी मी आणि मुंबई फिल्म कंपनी फारच उत्सुक आहोत,” असं जेनेलियाने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

मुंबई फिल्म कंपनीने आतापर्यंत बालक पालक, यलो, लई भारी या सिनेमांची निर्मिती केली होती. आता चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी आणि मराठी जनतेचं स्फूर्तीस्थान असेलल्या जाणता राजावर चित्रपट करण्याचा मानस जेनेलिया आणि एमएफसीचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर शिवरायांचा जीवनपट पाहायला मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सिनेमा किंवा चित्रपट बनवणाऱ्यांना सरकार निधी देणार असल्याची घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *