एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित

एअर इंडियाचा  प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एअर इंडियाच्या १९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय.  केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली. वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालीय.

मुंबईत जानेवारी महिन्यात कोरोना रुग्ण  संख्या वाढू लागली आहे. दिवसाला सरासरी ३०० ते ३५० रुग्ण वाढ होत होती. पण आता हा आकडा ६५० पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत लोकल  सर्वांसाठी सुरु केल्यानंतर १५ दिवसांनी निरीक्षणांचा कालावधी आहे.  २१ फेब्रुवारीला संपत असल्याने २२ फेब्रवारीला महापालिका आढावा घेणार आहे.

२२ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर लोकलबाबतचा निर्णय हा बदलला जावू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या रुग्ण संख्येत विदर्भात झपाट्यानं वाढ होतेय. त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहराचा समावेश आहे. अकोल्यात गेल्या आठवडाभरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढलीय.कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही नवीन नियमावली तयार करण्यात आलीय. ही नियमावली 28 फेब्रुवारी पर्यंत राहणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *