तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून ६ जून २०२० रोजी सांताक्रूझ पोलिसांनी या तिघांसह १६ जणांविरोधात एफआयआर नोंदवला. ‘२०१९मध्ये माझा विवाह ठरल्यानंतर माझ्या भावी पतीच्या कुटुंबीयांनी माझ्या वडिलांवर हुंड्यासाठी प्रचंड दबाव आणला. अखेर माझ्या वडिलांनी ६ जुलै २०१९ रोजी त्यांना २० लाख रुपये रोख दिले आणि त्यानंतर ८ जुलै २०१९ रोजी माझा विवाह झाला. त्यानंतर पतीने माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. परंतु, तो नंपुसक असून, त्याविषयी त्याचे वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे मला नंतर कळले. काही दिवसांनी सासरच्यांनी आणखी हुंड्याची मागणी केली आणि माझा छळ सुरू केला. २२ जानेवारी २०२० रोजी माझा पती, दीर व सासरे अचानक माझ्या खोलीत आले. पती व दीराने मला धरून ठेवले आणि सासऱ्यांनी मला जबरदस्तीने कसले तरी इंजेक्शन दिले. तसेच त्यानंतर माझ्यावर बलात्कारही केला. त्यानंतर महिन्याभराने सासरच्यांनी मला माहेरी पाठवले आणि जोपर्यंत आणखी पैसे देत नाही, तोपर्यंत मुलीला सासरी पाठवू नका, असा निरोप त्यांनी माझ्या पालकांना दिला. मार्च-२०२०मध्ये ही सर्व मानसिक यातना मी माझ्या बहिणीला सांगितली. त्यानंतर नाईलाजाने या छळाला कंटाळून जून-२०२०मध्ये मी पोलिसांत तक्रार दिली’, असे फिर्यादी महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
नवविवाहित सुनेला विशिष्ट इंजेक्शन देऊन नंतर आपल्याच दोन मुलांची मदत घेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप असलेल्या डॉक्टर सासऱ्याला अटकेपासून संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. आरोपीच्या दोन्ही मुलांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्या. सारंग कोतवाल यांनी फेटाळून लावले
