उरणमध्ये तेल तस्करांच्या मुसक्या आवळल्या

उरण, मोरा सागरी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि.8) तेल तस्करी करणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पनवेल क्राईम झोन 2 च्या माध्यमातून करण्यात आली आहे.

उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. तर जेएनपीटी बंदरासारखे जागतिक स्तरावरचे बंदरही याच हद्दीत आहे. यामुळे येथील सांगती भागामध्ये मोठ्या प्रमाणात जहाजांची वर्दळ सुरू असते. याचाच फायदा घेत येथील सागर किनार्‍यावर तेल तस्कर सक्रिय झाले आहेत. या तेल तस्करांच्या माध्यमातून समुद्रामध्ये उभ्या असणार्‍या जहाजांमधून तेल काढून या तेलाची तस्करी करण्यात येते. ही तस्करी उरणच्या किनार्‍यावरून होत असून, येथील तस्करांचा शोध अनेक वर्षं सुरू होता.

रविवारी मध्यरात्री पनवेल क्राईम झोन 2 च्या एका पथकाने उरणच्या पणजा खाडीमध्ये धाड टाकून कारवाई करत तेल तस्करीसाठी वापरात आलेली बोट आणि तीन हजार लिटर मोटर स्पिरिट तसेच हायस्पीड डिझेल असा एकूण 12 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर या तस्करीमधील अखिलेश वसंत रावकुमार, लक्षमन पप्पू वाल्मिकी (चेटा) आणि दिनेश अर्जुन गायकवाड (कड्या) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *