पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावर गुरुवारी ४०६ तोफगोळे आढळले. हे गोळे शिवकालीन असल्याचा दावा दुर्गप्रेमी इतिहास संशोधकांनी केला आहे.
पावनगड हा किल्ला शिवरायांनी मार्कडेय डोंगरावर बांधला. या किल्ल्याच्या राजवाड्याशेजारी असलेल्या महादेव मंदिराजवळ टीम पावनगड आणि वनविभागाच्या वतीने दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी फलक लावण्यासाठी एक फूट उकरल्यावर काही गोळे दिसले. याची कल्पना टीम पावनगडच्या कार्यकर्त्यांनी सुखदेव गिरी आणि राम यादव याना दिली. त्यांनी पुरातत्व आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तोपर्यंत त्या खड्यात जवळजवळ ४०६ तोफगोळे सापडले.