ज्याला बॉल समजून खेळत होती शाळेतली मुलं, जमिनीवर आदळताच…

झारखंडमधील धनबाद येथे बॉम्बचा स्फोट झाल्याने तीन मुलं जखमी झाले आहेत. शाळेतली मुलं ही बॉम्बला बॉल समजून खेळत होती. पण दगडावर आदळताच हा बॉम्ब फुटला. ज्यामध्ये ही मुलं गंभीर जखमी झाली. एका मुलाची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर  उपचार सुरु आहेत.

हा बॉम्ब जमिनीखाली होता. एका मुलाने तो काढून फेकताच त्याचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी एका प्लास्टिकच्या डब्यात लपवून ठेवलेले बॉम्ब ताब्यात घेतले. पण हे बॉम्ब येथे कोणी ठेवले याची माहिती अजून मिळालेली नाही.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. तर इतर दोघे जण जमखी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *