नावेदला मदत करणारा ट्रक चालक अटकेत

उधमपूर दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी अतिरेकी नावेद याकूबला मदत करणा-या ट्रक चालकाला शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. नावेद आणि त्याच्या साथीदाराने जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता.

बीएसएफ जवानाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नावेदचा साथीदार ठार झाला आणि गोळीबार करुन घटनास्थळावरुन पळणा-या नावेदला स्थानिक गावक-यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

एनआयएने नावेदला दिल्लीमध्ये आणून त्याची पॉलिग्राफ चाचणी केली तसेच काश्मीर खो-यात प्रवेश केल्यानंतर तो ज्या ज्या ठिकाणी गेला तिथे त्याला घेऊन गेले.

नावेदने खो-यात त्याला कोणी कोणी मदत केली त्यापैकी काहीजणांची ओळख पटवली. नावेदच्या माहितीवरुन एनआयएने लष्कर-ए-तय्यबाच्या दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रेही प्रसिध्द केली आहेत. नावेदसोबत हे दोन दहशतवादीही काश्मीर खो-यात घुसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *