लिफ्टमध्ये अडकले होते अमित शहा

लिफ्टमध्ये अडकले होते अमित शहा

बिहारच्या पाटणामधील एका गेस्ट हाऊसमधील लिफ्टमध्ये गुरुवारी रात्री भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि तीन ज्येष्ठ नेते अडकले होते.

रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. अखेर चाळीस मिनिटांनंतर या सर्वांना लिफ्टबाहेर काढण्यात यश मिळाले. ही घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये कोणी लिफ्ट ऑपरेटरही नव्हता, असे भाजपाचे नेते मंगल पांडे यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर अमित शहा पाटणामध्ये आले होते. यावेळी त्यांनी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. अमित शाह पाटण्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत जात असताना त्यांची लिफ्ट मध्येच बंद पडली.

यावेळी शहा यांच्यासह बिहारचे भूपेंद्र यादव, सचिव नागेंद्र आणि सरचिटणीस सौदन सिंग उपस्थित होते. ४० मिनिटांनंतर या सर्व नेत्यांना लिफ्टमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. शहा आज सकाळी पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *