मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाका परिसरात ट्रॅव्हल्स बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे. बस आणि कंटेनरमध्ये धडक होऊन हा अपघात घडला. अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून ट्रॅव्हलचा बसचालक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते.
पहाटे चार वाजता मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
