मध्य रेल्वे मार्गावर 27 जानेवारी रोजी अंबरनाथ- बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या रेल्वे अपघात प्रकरणी TRT मशीन ऑपरेटर जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. तपासात टीआरटी ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा ठपका रेल्वे पोलिसांनी ठेवला आहे. मशिन ऑपरेटर सुनील कुमार तथा सोनू सिंहला अटक करण्यात आली आहे. त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या अपघातात एका कामगाराचा झाला होता मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू होते. यावेळी झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाले होते. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला.(Central Railway service disrupted ) त्यामुळे रूळांखाली लावले जाणारे स्लिपर्स अंगावर पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले. अपघात ठिकाणी मेन्टेनन्स मशीन सध्या ट्रॅकवरच अडकून पडले होते. हे मशीन हटवण्यासाठी क्रेनही आणण्यात आली. अनेक तासानंतर हे मशीन हटवण्यात यश आले.
