कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कोविड लसीकरणाला सुरुवात केली आहे.उरणमध्ये गुरुवारपासून कोविड लसीकरणाला तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली.इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी पहिली लस घेतली.
उरणसाठी एकूण 355 कोविड लस प्राप्त झाल्या आहेत.त्यामधील दररोज 100 जणांना कोविड लसीकरणाची लस टोचली जाणार आहे.यासाठी ऑनलाईन नोंदणी जिल्हा पातळीवरून करून त्याठिकाणावरून जी नावे येतील त्यांनाच लस टोचली जाणार आहे.लस टोचणीसाठी येताना नावाची नोंदणी करताना जी कागदपत्रे सादर केली असतील,त्यापैकी कागदपत्र येताना बरोबर घेऊन येणे बंधनकारक असणार आहे. हा पहिला डोस आहे, त्यानंतर 28 दिवसांनंतर निश्चित केलेला दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे,प्राध्यापक राजेंद्र मढवी,समन्वयक संतोष पवार,आरोग्य अधिकारी मोहन जगताप,डॉ. लतिका पोवळे,सिस्टर प्रमुख सारिका शेणेकर,ऑपरेटर जितेंद्र झेंडेकर, सिस्टर्स हिरा वीर,कृपा पाटील,निवेदिता कोटकर आदी उपस्थित होते.
