राजपथावर उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथानं पटकावला पहिला मान

राजपथावर उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथानं पटकावला पहिला मान

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर चित्ररथांचं सादरीकरण झालं. 26 जानेवारीला पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. यंदा या चित्ररथ सोहळ्यात कोणत्या राज्यानं पहिला मान पटकवला याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे. या चित्ररथ सोहळ्यात राम मंदिराच्या चित्ररथानं पहिला क्रमांक पटकवला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या चित्ररथाला बक्षीस दिलं जाणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारचं या चित्ररथामुळे खूप कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशातून यंदा राम मंदिराचा देखावा असलेला चित्ररथ साकारण्यात आला होता. सर्वांच्या नजरा राजपथावर या चित्ररथाकडे खिळल्या होत्या.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथाची यंदा थीम काय असावी यावर प्रत्येक राज्यानं विचार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मात्र आगळी-वेगळी कल्पना सुचली. काही दिवसांपूर्वी राम मंदिराचं भूमीपूजन पार पडलं. तर राम मंदिराचा चित्ररथच यंदा करावा अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. ही कल्पना सर्वांनाच आवडली आणि साकारही झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *