नालासोपा-यातील महिलेची हत्या करणारा सापडला

गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करुन दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणा-या नराधमाला नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

नालासोपा-यात गटकीदेवी अंबालाल देवाजी (२५) या गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या दीड वर्षीय मुलाचे अपहरण त्याने केले होते.

तिचा नवरा, मुलगा आणि दीर असा परिवार नालासोपारा पूर्वे येथील साई सहारा या इमारतीत रहातात. गुरुवारी दुपारी शेजारी आणि नातेवाईकांनी गटकीदेवीच्या घरात प्रवेश केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान, दीड वर्षाच्या मुलाला सोडवण्यासाठी महिलेचे पती अंबालाल यांना दीड लाखाच्या खंडणीचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून त्याला २४ तासाच्या आत अलगद जाळ्यात अडकवले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *