मुंबई, ठाणे आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी वीज गायब

मुंबई, ठाणे आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी वीज गायब

मुंबई, ठाणे आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अनेक ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोंधळ उडाला.

मुंबई उपनगरातील भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलूंड व ठाणे परिसरातील अनेक भागांत वीज गायब होती.

तांत्रिक बिघाड झाल्याने बत्ती गूल झाल्याचे महावितरणने सांगितले. हा बिघाड नेमका कोणत्या ठिकाणी झाला याची माहिती मिळवण्यात आली असून दुरुस्तीकाम सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *