डब्बेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

भाष तळेकर यांच्यावर डबेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्याअंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच ही एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डबेवाल्यांचा दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले.

नवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचे सांगून सुभाष तळेकर याने साठ डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता. सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळाली नाहीच. परंतु त्यांच्या खात्यातून पैसेदेखील वजा होऊ लागले. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी करून फोन देखील येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचं कळतात काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *