कोरोना पाठोपाठ देशात बर्ड फ्लूच्या संकटानं पाऊल ठेवलं आहे. देशातील 7 राज्यांमध्ये पक्षांच्या मृत्यूमुळे सर्वांची झोप उडाली आहे. जम्मू-काश्मीर आणि तमिळनाडूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे. कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हरियाणातील पंचकूलामध्ये मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तपासणीसाठी सॅम्पल जालंधर आणि भोपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर केरळमध्ये बर्ड फ्लूला आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 30 हजारांहून अधिक कोंबड्या आणि बदकांना मारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे..
देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आरोग्य विभाग आणि पशुपालन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
देशातील सात राज्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने खळबळ

