स्मशानभूमीचं छत कोसळून २१ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितलं आहे.

अत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभा राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण त्याखाली दबल्या गेले. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.

या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “मी जिल्हा अधिकार्‍यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *