विदर्भातील वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येथे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, काल संध्याकाळी मुसळधार पावसाने नाल्याला पूर आल्याने चार जण वाहून गेले आहेत. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्यांपैकी दोन महिला, एका पुरुषासह एका मुलाचा समावेश आहे. या मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही.नसोनेगाव आष्टा रोडवरील शुक्रवारी संध्याकाळी घडली घटना आहे. शेतातून कामावरून परत जात असताना हे चौघे नाल्यातून वाहून गेलेत.
नाल्याला अचानक पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलगाडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते. अचानक बैलगाडी नाल्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात फसली गेली. यावेळी बैलगाडीतील दोन महिला पाण्यात फेकल्या गेल्यात. त्या वाहून गेल्यात. नाल्याला प्रचंड पाणी असल्याने आणखी दोघे वाहून गेलेत.
या चौघांचे मृतदेह रात्री उशिरा आढळले हाती लागले आहे. सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृतांची नावे आहेत. तर सकाळी सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात गोजी येथे १२ वर्षीय मुलाचा आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडला. दरम्यान, या दोघांची ओळख पटलेली नाही.