करोना- ठाणे, कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक रुग्णसंख्या

ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या कायम राहिली असून, जिल्ह्यातील सर्वाधिक करोनारुग्ण हे ठाणे महापालिका, तसेच कल्याण-डोंबिवली परिसरात आढळले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात १,५६१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून,एकूण रुग्णसंख्या ३१ हजार ८५० इतकी नोंद झाली आहे. तर गेल्या २४तासांत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे १,०१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी ३३८ नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ८,५०६ इतकी नोंद झाली. तर २४ तासांत तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात दिवसभरात पुन्हा ४३५ रुग्णांची नोंद झाल्याने पालिका क्षेत्रातील बधितांचा आकडा ६,११७ वर पोहचला. तर सहा जणांमृत्यूसह एकूण मृतांचा आकडा ११३ वर पोहचला आहे. अंबरनाथ शहरात ८८ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण बाधितांची संख्या १,७६९ वर गेली आहे. तर उल्हासनगर शहरात १३७ रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांची संख्या १,७६६ इतकी झाली आहे. बदलापूर शहरात २१ नव्या रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या ७४२ वर गेली आहे. ठाणे ग्रामीण भागात आतापर्यंत १,४९३ रुग्ण आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *