पार्लरसाठी पहिला दिवस स्वच्छतेचा

टाळेबंदीमुळे तीन महिने बंद असलेली ब्युटिपार्लर रविवारी सुरू झाल्यानंतर शहरातील ब्युटिपार्लरचा पहिला दिवस साफसफाईचा आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यातच गेला. निर्जंतुकीकरण तसेच सुरक्षेचे साहित्य वापरण्यात येत असल्याने ब्युटिपार्लरनी सौंदर्यसेवेच्या दरात अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढ के ल्याचेही दिसून आले.

ब्युटिपार्लरमध्ये के स कापणे, के सांना रंग लावणे, आयर्निग, स्ट्रेटनिंग, आय ब्रो, या सौंदर्यसेवांना परवानगी देण्यात आली आहे. तर त्वचेशी जवळून संपर्क येणारे फे शियल, क्लीन अप, वॅक्सिंग यांसारख्या सौंदर्यसेवांना मनाई करण्यात आली आहे. याचबरोबरच शहरातील ब्युटिपार्लरनी निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेच्या साहित्याच्या वापरासाठी सौंदर्यसेवांच्या दरात २५० ते ३०० रुपयांनी वाढ के ली आहे. पार्लर आणि के शकर्तनालयाचे  दिवसातून पाच वेळा निर्जंतुकीकरण करणे, वापरा आणि फे का प्रकारचे हातमोजे, मुखपट्टया, फे स शिल्ड, पीपीई कीट, चादरी, सौंदर्यसेवेचे साहित्य वापरणे या मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. ग्राहकांनी प्रवेश के ल्यावर तापमानांची नोंद करणे, सॅनिटायझरने हात धुणे आणि त्यांना प्रवास, आजाराची माहिती विचारणे या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शहरातील बहुतांश ब्युटिपार्लर ग्राहकांची आगाऊ नोंदणी के ली जात असून, सर्व व्यवहार ऑनलाइनच होत आहेत. काही नामांकित ब्युटिपार्लरनी ग्राहकांना घरूनच रुमाल अथवा नॅपकीन आणण्यास सांगितले आहे. ‘आम्ही १ जुलैपासून पार्लर सुरू करणार असून, शासकीय नियमानुसार सुरक्षेचे नियम पाळले जातील. त्वचेशी संपर्क येणाऱ्या फे शियल, ब्लीच, क्लीन अप, मॅनिक्युयर आणि पेडिक्युयर यांसारख्या सौंदर्यसेवा देण्यात येणार नसल्याचे’ ब्युटी पार्लरचालक श्रद्धा शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *