मला कोरोनाची ची लागण झाली होती. आमच्या ऑफिस मध्ये एकाचवेळी तिघे व नंतर एक जण Corona positive झाले.
Corona आजारामधून मी पूर्णपणे बरी होऊन आता माझी टेस्ट , Negative आलेली आहे. मला आलेले अनुभव मी आपणा सर्वांसमोर ठेवत आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या कोरोनाला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
आपल्याला Corona होणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे, आणि दुर्दैवाने झालाच तर, अजिबात घाबरुन न जाता 100 टक्के आपण यातून बरे होणार आहोत याची मनामध्ये खात्री बाळगा.
Corona झाल्याची शंका अथवा टेस्ट positive आल्यास सर्व प्रथम negative विचार, negative WhatsApp फेसबुक पोस्ट, negative विचारांची लोकं यापासून स्वतः ला दूर ठेवावे. Corona आपल्या नेहमीच्या सर्दी ताप खोकल्याच्या आजारासारखाच आजार आहे असे मनामध्ये गृहीत धरुन घरातील गरम पाणी, आयुर्वेदिक मसाले त्यात अद्रक, काळी मिरी ,तुळशी ,हळद, मध, लिंबू ,दालचिनी, लवंग ,चक्री फुल अशा वस्तूंचा समावेश करून गरमागरम काढे दिवसातून 4-5 वेळा पिणे तसेच अत्यंत पौष्टीक प्रोटीनयुक्त आहार, भरपुर C vitamin युक्त फळे , पुरेसे ऊन अंगावर घेणे. असे उपचार करावेत.
त्याचबरोबर मी ओवाफुल व भीमसेनी कापूर यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या तेलाची वाफ 2-3 वेळा दिवसातून घेतली. मला प्रचंड ताप येऊन अंगदुखीचा त्रास होऊन जिभेची व घशाच्या सर्व संवेदना नाहीशा झाल्या चे लक्षात येताच मी घरगुती काढे सुरू केले व दरम्यान covid ची टेस्ट करून घेतली. दुसऱ्या दिवशी टेस्ट positive आली.
Covid Asymptomatic असल्याने व घरात एकटीच असल्याने (दुसऱ्याला लागण होण्याची चिंता नसल्याने) बीएमसीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घरी quarantine राहिले.
मी केरळ मधील Corona पेशंट वर झालेल्या उपचाराबाबत माहिती घेत होते. तेथील बरे होणारांचे प्रमाण 99% असून जीवित हानी अथवा लागण झालेल्यांचे प्रमाण कमी असल्याने नवी मुंबई मधील या केरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल यांचे काढे व औषधोपचार घेतले त्याने माझा करोना तीन दिवसात पूर्णपणे बरा झाला. माझी करोनाची सर्व लक्षणे नाहीशी झाली. त्याच दरम्यान माझ्या ऑफिस मधील दोघं सहकाऱ्यांची तब्बेत खराब होऊन दवाखान्यात admit झाल्याची माहिती मला मिळाली.
मी अतिरिक्त काळजी पोटी घरामधे उपलब्ध असलेल्या ऑफिस मधून सरसकट सर्वांना immunity वाढविण्यासाठी दिल्या गेलेल्या Hydrocloroquin 200 mg चे 3 डोस घेतले, आणि मला श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागला.
Heart मध्ये प्रचंड वेदना होऊन पूर्ण घामाघूम झाले. वाटले माझा कोणताही क्षण शेवटचा ठरू शकतो. अशावेळी मी batchmate मैत्रीण नीलम ला कॉल करून मला हॉस्पिटल मध्ये admit व्हायचे म्हणून कळवले. तिने तात्काळ admission ची व्यवस्था असल्याचे कळवून अंबुलेन्स घेऊन निघण्यास सांगितले. पण मला तेवढी सबुरी नसल्याने चुनाभट्टी येथून माझी गाडी स्वतःच घेऊन जाऊन मी अंधेरी मुंबई येथे admit झाले. त्याठिकाणी मला ऑक्सीजन देण्यात आला माझे heart beats फारच low झालेले होते तसेच तेथे Chest X-ray व ECG काढण्यात आला असता चेस्ट मध्ये कुठलेही infection नव्हते तर ह्रदयावर हायड्रोक्लोरिक्वीन चा परिणाम होऊन मला श्र्वसनाचा त्रास झाला होता असे निदान झाले. डॉ नी सांगितले 2 ते 3 दिवसात नॉर्मल होणार. त्याप्रमाणे मी पूर्णतः बरी होऊन Corona test देखील 5 दिवसात negative होऊन मी सुखरूप घरी परतलेली आहे.
घरची मुले व नातेवाईक मंडळी नाहक चिंता करतील याकरिता मी अद्यापि ही गोष्ट घरी कळविलेली नाही. Corona ह्या आजाराची लढाई आपल्यालाच लढायची आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करण्यात येते की हायड्रोक्लोरिक्वीनचा डोस घेताना काळजी घ्या. ओवा फूल व भीमसेनी कापुर यांच्यापासून तयार झालेल्या तेलाचे तीन-चार थेंब पाण्यात टाकून त्याची घेतलेली वाफ, काढे व घरगुती उपचार याने कोरोना पूर्णपणे बरा झाला असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
Corona सारख्या अशा गंभीर आजाराच्या परिस्थितीमध्ये माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या तसेच वेळोवेळी मानसिक आधार देणाऱ्या माझ्या वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर व सहकाऱ्यांचे तसेच माझ्या मित्र मैत्रिणींचे, शेजारील सख्यांचे खूप खूप आभार.
Corona सारख्या गंभीर आजारावर मधू घोरपडे (पोलीस निरीक्षक,मुंबई ) यांना आलेले अनुभव
