महाराष्ट्र कोरोनाचं थैमान सुरुच, ICU बेड्सची भासू शकते कमतरता

देशातील कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात 37 हजाराहून अधिक लोकं कोरोना विषाणूच्या संपर्कात आले आहेत. गेल्या 24 तासांत 76 लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 23 जण फक्त मुंबईतील आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णालयांच्या स्थितीबद्दल लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटलं की, ‘आगामी काळात आयसीयू बेड्सची कमतरता भासू शकते. ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, त्यानुसार आयसीयू बेड्सची कमतरता आहे. सरकारने या दिशेने विचार करणे आणि पाऊलं उचलणं आवश्यक आहे.’

 ते म्हणाले की, ‘राज्यातील कोरोना प्रतिबंधक उपाय पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत नाहीये. त्यामुळे या दिशेने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी गाईडलाईन्सवर काम करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कोरोना नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा विषयही गंभीर आहे. याचा विचार केला पाहिजे.’

अमेरिकेतील कोरोनाच्या स्थितीवर, बोस्टनमधील सेंट एलिझाबेथ मेडिकल सेंटरचे डॉ. अमित आनंद यांनी म्हटलं की, ‘अमेरिकेत कोरोना प्रकरणे स्थिर आहेत. पूर्वी ज्या वेगाने प्रकरणे पुढे येत होती, ती आता नियंत्रणात आहे. कोरोना रोखण्यासाठी आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत. जरी परिस्थिती सुधारल नसली तरी ती हाताबाहेर देखील गेलेली नाही.’

महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण 1325 लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 26 हजार 164 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9639 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत कोरोनाची 26 हजार 164 रुग्ण आहेत आणि एकूण 800 लोकांचा बळी गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *