करोनाच्या भीतीने गाव गाठला; पुण्यात बंद फ्लॅट फोडला

करोनाच्या भीतीने फ्लॅट बंद करून गावी गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून ८७ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सुधीर ठाकूर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. करोनाचा प्रादुर्भाव पुण्यात वाढ लागल्यामुळे ते २० मार्चला ते कुटुंबीयांसोबत गावी गेले होते. त्यानंतर चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून ८७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. सुधीर यांना शेजाऱ्यांनी घरात घरफोडी झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते गावाहून तातडीने परत आले. त्यांनी पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सुधीर यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *